दौंड तालुका ग्रामीण प्रतिनिधी /सुरेश बागल
दौंड शहरांमध्ये कॅम्प कॅम्पुटर ट्रेनिंग सेंटर अँड टायपिंग इन्स्टिट्यूट ऑफिस समोर ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना मोफत बॅग व ओळख पत्र वाटप करण्यात आले. संस्थेच्या माध्यमातून शिक्षण संस्था व कंप्युटर प्रशिक्षण दुर्बल, मागासवर्गीय विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना मोफत दिले जाते. यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव रणदिवे सर, संस्थेचे सचिव रणदिवे मॅडम व सर्व पदाधिकारी, सदस्य व कर्मचारी यांनचे मोलाचे योगदान आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार तथा माहिती अधिकार कार्यकर्ता व पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष पॅथर जयदीप बगाडे दौंड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रोहित पाडळे पत्रकार, जानी बाबा शेख पत्रकार, संस्थेचे अध्यक्ष सदाशिव रणदिवे सर, सचिव रणदिवे मॅडम, संस्थेचे कायदेशीर सल्लागार अॅड. लोंढें तसेच मोठ्या प्रमाणात पालक, विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. हया वेळी अध्यक्षीय भाषणात पॅथर जयदीप बगाडे यांनी मुलांना शिक्षण देताना स्वतंत्र देण्याचे आव्हान पालकांना केले. तर मुलांना पालक आणि शिक्षक सांगतात, रागवतात यावर नाराज न होता आपल्या हिता साठी रागवत आहे हयाचे भान ठेवले पाहिजे. तसेच पालकांनी मुलांना दबाव टाकून शिक्षण दिले नाही असे सांगितले.