Homeराजकीयजे अजित पवारांच्या सहकार्याने राजकारणात टिकून राहिले ते अजितदादांचे झाले नाही ते...

जे अजित पवारांच्या सहकार्याने राजकारणात टिकून राहिले ते अजितदादांचे झाले नाही ते मतदारांचे काय होणार – बापू भागवत

वृत्तवेध न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी भीमा पाटस बरोबर घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर देखील खरे बोलावे असे मत दौंड तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष बापू भागवत यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी बोलताना भागवत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शप) चे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांची नुकतीच रमेश थोरात यांच्या प्रचारासाठी सभा घेतली या सभेत कोल्हे हे भीमा पाटस कारखान्यावर बोलले. निष्ठा काय आसावी यावर बोलले परंतु हे बोलत असताना ते विसरले की ते शिरूर हवेली मतदार संघात ज्या अशोक पवारांचा प्रचार करत आहेत त्यांनी सहकारी साखर कारखान्याची काय अवस्था केली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचे पैसे मिळाले नाहीत. सहकारी कारखाना मोडीत काढण्यासाठी खाजगी कारखाना देखील अशोक पवारांनी काढला असून तो जोमाने सुरू आहे. कोल्हेंनी थोडं त्याविषयी बोलायला पाहिजे होते पण त्याचा त्यांना विसर पडला असावा.

रमेश थोरातांचा प्रचार करत असताना ते निष्ठेविषयी बोलले पण ज्यांनी जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेस पक्षाला फसवले आणि ऐनवेळी अजित पवारांचा हात धरला आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप पुरस्कृत अपक्ष म्हणून निवडून आले, पुन्हा स्वार्थासाठी अजित पवारांकडे गेले. २०२४ लोकसभेला अजित दादांचे काम केले आणि पुन्हा स्वतःच्या स्वार्थासाठी पवार साहेबांचा हात धरला, अशा धोकेबाज माणसाच्या निष्ठेविषयी कोल्हेनी बोलावे हे हास्यास्पद आहे.

ज्या अजित पवारांच्या सहकार्याने राजकारणात टिकून राहिले ते त्यांचे झाले नाहीत ते मतदारांचे काय होणार. यात कोल्हेंची चूक नाही त्यांना माहीत नाही की कोल्हे ज्या पक्षाचे काम करतात त्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्व. सुभाष कुल व आमदार राहुल कुल यांचे कारखान्याबाबत अनेकदा कौतुक केले आहे.

भीमा पाटस चालू झाला हेच विरोधकांचे मूळ दुखणे आहे. परंतु इथला शेतकरी मात्र समाधानी आहे त्यामुळे दौंड तालुक्यातील मतदार खासदार अमोल कोल्हे यांना किती गांभीर्याने घेतील असं वाटत नाही असेही शेवटी दौंड तालुका युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बापू भागवत म्हणाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हर्च्युअल डिजिटल अ‍ॅसेट मार्केटमध्ये कॉर्पोरेट सहभागाची व्याख्या करण्यासाठी दक्षिण कोरियाच्या एफएससीची योजना अनावरण करा

दक्षिण कोरिया आपला वेब 3 मार्केट विकसित करण्यासाठी विविध अंतर्गत अधिका authorities ्यांसह सहकार्य करीत आहे. नुकत्याच एका हल्ल्यात, वित्तीय सेवा आयोगाने (एफएससी) स्थानिक...

विराट कोहली ऑन फोन कॉल ऑन इंडिया ट्रॉफी सेलिब्रेशन, व्हायरल व्हिडिओ इंटरनेट तोडतो

अहमदाबादमध्ये वेड्सवर तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात १2२ धावांनी जिंकल्यानंतर भारताने इंग्लंडवर -0-० व्हाईटवॉश लावला. रोहित शर्माच्या क्षमतेनुसार घरातील व्हाईटवॉश ही चौथी मालिका व्हाईटवॉश होती, जी...

error: Content is protected !!