दौंड तालुका ग्रामीण प्रतिनिधी/ सुरेश बागल
जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा १५ ते २० दिवसात पुणे-हडपसर-ऊरूळी-सहजपूर – यवत-चौफुला- पाटस रोडवरून जाणार आहे. महाराष्ट्र शासन रस्त्यावरील ञुटीसाठी करोडो रूपये खर्च करतात हा पैसा गेला कुठे हा सामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. सहजपुर M Pack कंपनीपुढे-पूर्ण रोडवर भरपूर मोठे खड्डे पडले आहेत. बोरीभडक गावच्या म्हेञे वस्तीजवळील बोरीऐंदी फाट्यावर रस्त्याकडेला पुण्यावरून सोलापूर कडे जाणारे टेम्पो, पिकअप वाले रस्त्यावर भरपूर घाण, कचरा टाकला जात आहेत हडपसर पासून-यवत पर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी अनधिकृत कचरा टाकला जात आहे. सध्या कोरोना-रोगराईचा कालावधी चालू असल्याने रोजच दवाखाने फुल आहेत. कचऱ्यामुळे डेंगू होऊन लहान मुले आजारी पडत आहेत. कासुडी-पाटस टोलनाक्यापर्यंतच्या रस्त्यावर भरपूर धोकादायक खड्डे यवत ,भांडगाव, पाटस परिसरात पडले आहेत. यवत कांचन सी फुड हाॅटेलपुढे,कांचन व्हेज हाॅटेलजवळ ,लकी हाॅटेल जवळ,भाडगाव, चौफुला, पाटस, सहजपूर परिसरातील रस्त्यावर भरपूर प्रमाणात साईडपटटयावर माती-कच आली आहे. सध्या पावसाळा चालू असल्याने टयु व्हीलर गाड्या रस्त्यावर घसरण्याचे प्रमाणात वाढ झाली आहेत.तरीपण प्रशासनाला एकच विनंती आहेत की १५ ते २० दिवसांत या रस्त्यावरून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा जाणार आहे. हडपसर पासून रस्त्यावरील खड्डे, साईडपटटयावरील माती-कचरा,रस्त्याकडेचा कचरा-घाण ,लोखंडी जाळ्या, चौकाचौकांतील सिग्नल,पांढरे पट्टे मारून पालखीतील लाखो वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी. जिल्हाधिकारी-तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच यांनी लक्ष देऊन लवकरच खड्डे,घाण,कचरा-तुटलेल्या जाळ्या,चौकाचौकांतील सिग्नल, साईडपटटयावरील माती-कच साफ-बुजवावेत तसेच दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी कारवाई न केल्यास बोरीभडक पालखी स्वागत कमानीजवळ उमेश म्हेञे आंदोलन करणार आहेत असे प्रशासनास तीव्र शब्दात बोलत आहेत.