चाकण — शहरालगत असणाऱ्या पोदार इंटरनॅशनल स्कुल रोहकल येथे विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे सुप्त कलागुण जोपसण्याचा मानस समोर ठेवून प्रशालेचे प्राचार्य विशाल जाधव यांच्या मार्गदर्शनाने सर्व विद्यार्थ्यांसाठी चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थिती निलेश संभूस,उद्योगपती खेड.प्रशालेचे प्राचार्य विशाल जाधव, उप प्राचार्या शितल जयस्वारा, पोदार प्रेप हेड मिस्ट्रेस – पुबिंदर कौर
या मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन व दिप प्रज्वलान व फित कापून करण्यात आली. सदर चित्रप्रदर्शन हे,
“आर्ट ‘ स्पिरेशन : कल्चरर्स अक्रॉस कॉन्टीनंट ” या थीम वर आधारित करण्यात आले.या मध्ये , जगातील ,निरनिराळ्या देशांपैकी, कलात्मक वारसा लाभलेल्या एकूण आठ देशांच्या निरनिराळ्या कला, व संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या कलाकृतींचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये प्रामुख्याने, भारत, रशिया, बाझील, चिन, जपान, स्पेन, मेक्सिको,ग्रीस. या देशांच्या निरनिराळ्या पद्धतीच्या कलात्मक कलाकृती व त्या देशातील सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या , पारंपरिक नृत्य, पोशाख , खाद्य संस्कृती ,आदींचे प्रदर्शन हे विध्यार्थ्यांद्वारे करण्यात आले.
प्रदर्शनात निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे, आधुनिक आणि पारंपरिक शैलीतील विविध चित्रे . विशेषतः जलरंग, ऍक्रेलिक, तेलरंग आणि कोळशाच्या रेषांत साकारलेल्या कलाकृती,
पेपर म्याशे पद्धती पासून बनवलेल्या कलाकृती, पेन्सिल शेडींग, वास्तु शिल्पे, कलेचे मूलभूत घटक पासून केलेल्या कलाकृती, तसेच निरनिराळ्या पद्धतीचे क्राफ्ट ,व पेंटिंग हे मुख्य आकर्षण ठरले.व उपस्थितांचे लक्ष वेधले.
सदर कला प्रदर्शनात इयत्ता पहिली ते नववी च्या तब्बल अकराशे विध्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
प्रशालेच्या दालनात आयोजित केलेल्या चित्रप्रदर्शनाला विध्यार्थी व शिक्षक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .
यावेळी बोलताना,प्रशालेचे प्राचार्य श्री.विशाल जाधव यांनी, सर्व सहभागी विध्यार्थी कलाकारांच्या मेहनतीचे कौतुक करत, “चित्रकला ही केवळ रंगांची जादू नसून, ती मनातील भावना व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे,” त्यामुळे प्रत्येकाने, जीवनामध्ये कोणतीही एक कला आत्मसात करावी, तसेच निरनिराळ्या क्षेत्रांप्रमाणे, कला क्षेत्रांमध्ये सुद्धा करियर च्या खूप संधी आहेत. असे प्रतिपादन केले. व सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सदर प्रदर्शनाचे आयोजन व नियोजन शालेय सांस्कृतिक विभाग प्रमुख महेश मोरे, सिनियर कॉर्डिनेटर विवेक पिसाळ, यांनी केले. व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळा ऍडमिन विभाग व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.