संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
दौंड — स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब ह्या हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शक अन् स्वराज्याच्या प्रेरणास्रोत होत्या. माँसाहेब थोर पराक्रमी, युद्धनीती निपुण होत्या. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श राजनीती, युध्दकलेची शिकवण देऊन त्यांच्या राज्यकारभारात, तसेच विविध मोहिमांमध्ये महत्वपूर्ण मार्गदर्शनही केले.आजची स्त्री ही शक्ती असून संपूर्ण कुटुंबाचा कणा आहे, तिच्यांत निर्णय घेण्याची क्षमता आहे. त्यासाठी तिला समाजात आणि घरात मानाचे स्थान दिले पाहिजे. स्वामी विवेकानंद हे थोर देशभक्त आणि आधुनिक भारतातील एक प्रभावशाली विचारवंत होते त्यांनी समाजातील तरुणांना आत्मसुधारणा आणि देशाच्या सामाजिक प्रगतीसाठी सर्वांगीण प्रयत्न करण्याचे आवाहन करून प्रोत्साहन दिले, असे प्रतिपादन डॉ.संगिता जगदाळे पाटील यांनी केले.राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त दत्तपीठकडून आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या.
शाकंभरी पौर्णिमा निमित्त दत्तपीठ मंदिरात गुरुदेव दत्त तसेच स्वामी समर्थ महाराजांना महाअभिषेक करण्यात आला. राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद जयंती दत्तपीठ मंदिरात उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसगी राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी दौंड शहरातील कर्तबगार महिलांना राजमाता जिजाऊ माँसाहेब पुरस्कार देण्यात आला.
डॉ.संगिता जगदाळे पाटील तसेच शितल मावळे यांना राजमाता जिजाऊ माँसाहेब पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
यावेळी आमदार राहुल कुल, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया,माजी नगरसेवक बबलू कांबळे,आर.पी.आय नेते सतीश थोरात उपस्थित होते.
मकरसंक्रांत निमित्त दत्तपीठ मंदिरात महिला भगिनींसाठी हळदी कुंकू व तिळगुळ वाटप कार्यक्रम पार पडला.
गुरुदेव दत्ताची महाआरती सौ. प्रतीभा महादेव शिंदे या दाम्पत्यांच्या हस्ते संपन्न झाली.
यावेळी दत्तपीठ मंदिराचे प्रमुख विश्वस्त दत्तात्रय सावंत, विलास बर्वे, शाम वाघमारे, अशोक दिक्षित, अर्चना साने, स्वाती सावंत, शशिकला सावंत, बाळकृष्ण पंडित, जय गोलांडे, संजय सावंत, मनोज सावंत, रत्नाकर चोरमले, राजेश ढाणे, निलेश सावंत, निखिल सावंत, नरेंद्र सावंत, राहुल हजारे, एकनाथ कोरडे, राकेश भोसले उपस्थित होते.