संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
दौंड : तालुक्यातील आलेगाव ग्रामपंचायतींमध्ये R.O फिल्टर च्या माध्यमातून गोळा होणाऱ्या पैशांमध्ये मोठा प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची लेखी तक्रार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती.
आलेगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याची लेखी पुराव्यानिशी तक्रार महादेव इंगवले यांनी दिली आहे.
आलेगाव ग्रामपंचायतींमध्ये बसविण्यात आलेल्या R.O फिल्टर च्या माध्यमातून गोळा होणाऱ्या पैशांवर सन २०१६ – २०२४ या कालावधीत काही पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी डल्ला मारल्याचा ‘भांडाफोड’ महादेव इंगवले यांनी केला आहे.
आलेगाव मध्ये R.O फिल्टर च्या माध्यमातून जमा झालेले पैसे बँकेमध्ये जमा न करता परस्पर पैसाचा अपहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत आलेगाव ग्रामपंचायतींच्या आर ओ फिल्टर मध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार दिनांक ७ जून २०२४ रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे केली असता त्यांनी विस्तार अधिकारी एल एन जंजीरे यांची नेमणूक केली. त्यानी सखोल चौकशी केली असता दिनांक ७ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत आर ओ फिल्टर वॉटर मध्ये बारा लाख पंचाहत्तर हजार नऊशे रुपयांमध्ये अनियमिता दिसून आली आहे असा अहवाल गटविकास अधिकारी यांना दिला. मात्र, अद्यापपर्यंत कोणत्याही दोषींवर कारवाई करण्यात आली नाही,यामागे काय गौडबंगाल आहे हे कळेना.वारंवार पाठपुरावा करूनही दोषींवर गुन्हा दाखल होत नाही.अपहार केलेले लाखो रुपये वसूल करत नाही. घडलेला प्रकार महादेव इंगवले यांनी सर्व पुराव्याशी उघड केलेला आहे. अपहार केलेली रक्कम ग्रामपंचायत खात्यात जमा करावी, अशी मागणी महादेव इंगवले यांनी केली आहे.
आलेगाव ग्रामपंचायत आर ओ फिल्टर मध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा महादेव इंगवले यांनी दिला आहे.