दौंड तालुका ग्रामीण प्रतिनिधी / सुरेश बागल
दौंड तालुक्यातील कुरकुंभ परिसरातील साडेपाच वर्षाच्या लहान बालिकेला अपहरण करून त्या मुलीला मळद येथे उसाच्या शेतात नेऊन लैंगिक अत्याचार करण्याच्या तयारीत असणाऱ्या नराधमाला दौंड पोलिसांनी तात्काळ मध्ये मुसक्या आवळल्या. सदरच्या घटनेत नराधम नवनाथ रिठे याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी दिली. पुणे सोलापूर हायवेवर कुरकुंभ परिसराच्या हद्दीमध्ये एका किराणा दुकानासमोर खेळत असलेल्या साडेपाच वर्षाच्या चिमुकलीला उचलून नेऊन मळद गावच्या हद्दीत उसाच्या शेतात जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत ती चिमुकली ओरडल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता हा नराधम त्या बालिकेवर जबरदस्ती करत असल्याचे दिसून आले, त्या चिमुकलीला उचलून घेऊन पोलिसांना बोलवून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याची विचारपूस केली असता नवनाथ चंद्रकांत रिठे वय २७ रा. शेरीचीवाडी ता. फलटण, जि. सातारा असल्याचे सांगितले. चिमुकलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात भाग ५ गुन्हा रजिस्टर नंबर ३५३/२५ भा. न्या. संहिता कलम ६५ (२ ), १३७ (२ ), ११५ (२ ), पोस्को कलम ४,६, ८, १०,१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील घटनेतील
पुढील तपास चालू आहे. कुरकुंभ परिसरातील नागरिकांकडून या नराधमासाठी लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी अशी तीव्र शब्दात प्रशासनाकडे मागणी होत आहे.