दौंड तालुका ग्रामीण प्रतिनिधी : सुरेश बागल
दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे फिरंगाई मातेचा शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अश्विन महिन्यामध्ये संपूर्ण देशामध्ये शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवसाला पावणाऱ्या या देवीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दर्शन घेण्यासाठी भाविक येतात. महाराष्ट्र राज्यामध्ये साडेतीन शक्तीपीठे आहेत त्यापैकी १)कोल्हापूरची अंबाबाई २)तुळजापूरची तुळजाभवानी ३) माहूर गडाची रेणुका माता आणि नाशिक जवळ वनीची सप्तशृंगीमाता. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय ,सीसीटीव्ही कॅमेरे ,उत्कृष्ट दर्शन बारी, मंदिरातील स्वच्छता आणि शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. अशी माहिती फिरंगाई देवी देवस्थानचे मुख्य विश्वस्त राहुल कुलकर्णी यांनी दिली आहे. नवसाला पावणाऱ्या या फिरंगाई मातेचे सातव्या माळेचे खूप महत्त्व आहे. पाणी बॉटल, खिचडी, राजगिरा चक्की, शेंगदाणा चिक्की, आणि अनेक उपवासाच्या पदार्थांचे अन्नदान मोठ्या प्रमाणात केले जाते. नऊ माळे पैकी सातव्या माळेला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. फिरंगाई मातेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दोन मंदिर आहेत. नऊ दिवस नित्यनेमाने फिरंगाई मातेची सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम देवीची पूजा आरती आणि खालच्या मंदिरापासून वरच्या मंदिरापर्यंत पालखी निघते. वरच्या मंदिरात गेल्यानंतर देवीची पूजा आरती झाल्यानंतर विसाव्यासाठी पालखी थांबते. पालखी घेऊन खालच्या मंदिरात आल्यानंतर आल्यानंतर पालखीच्या मानकरी व खांदेकरी यांना विसावा मिळतो. पालखीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. नऊ दिवस फिरंगाई मातेचा शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी पहाटे होमामध्ये नारळ टाकला जातो. नंतर देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. त्यानंतर नऊ दिवसाचे उपास सोडले जातात. दसऱ्याच्या दिवशी फिरंगाई मातेची पालखी कुरकुंभ येथील मुख्य चौकात आल्यानंतर शीलांगण आणि लेझीम खेळण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सोनं घ्या ,नान द्या, असे म्हणत एकमेकांची गळाभेट घेतली जाते. अशाप्रकारे फिरंगाई मातेचा शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.