दौंड तालुका ग्रामीण प्रतिनिधी /सुरेश बागल
वीज कंत्राटी कामगारांच्या अनेक समस्यां राज्याचे मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री यांनी मीटिंग घेऊन सोडवल्या मात्र प्रत्यक्षात काही गंभीर समस्यां सुटल्या नसून कंत्राटदार व अधिकारी यांच्या हितसंबंधा मुळे कष्टकरी कामगार अडचणीत असल्याचे संघटना प्रतिनिधी यांनी लक्षात आणून दिल्यामुळे लवकरच भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची राज्याचे मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समावेत बैठक लावुन कामगारांना न्याय मिळवून देवू असे आश्वासन माजी वनमंत्री मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दिले.
पुणे येथे जेजुरी देवसंस्थानचे विश्वस्त राजेंद्र खेडकर यांच्या घरी सुधीरभाऊ मुनगंटीवार आले असता संघटनेच्या वतीने प्रदेश अध्यक्ष निलेश खरात, रोहन पवार, विकास माने, पश्चिम महाराष्ट्र समरसता गतीविधीचे रवी ननावरे इत्यादी उपस्थित होते.
उर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची अंमलबजावणी प्रशासकीय अधिकारी वर्गाने केली पाहिजे. शासन प्रशासना सोबत संवाद हवा संर्घष नको अशी अपेक्षा महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी यांनी व्यक्त केली आहे.