वृत्तवेध न्यूज नेटवर्क
दौंड विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार रमेश थोरात यांनी गावभेट,संपर्क प्रचार दौऱ्याला कानगाव मधुन सुरुवात करताच कानगाव मधील गावकऱ्यांनी रमेश थोरात यांचे उत्साहात जंगी स्वागत केले. यादरम्यान कानगाव मधील नागरिकांनी रमेशआप्पा आम्ही तुमच्यासोबत आहोत व तुतारीचे बटण दाबून तुम्हालाच विजयी करणार असल्याचे जाहीरपणे निर्धार व्यक्त केला. उमेदवारी अर्ज माघारी घ्यायचा दिवशी प्रमुख उमेदवार बादशाह शेख, राजाभाऊ तांबे, वसंतराव साळुंके यांनी माघार घेवून जाहिरपणे तुतारीचे काम करण्याचे निर्धार व्यक्त केला.आप्पासाहेब पवार, नामदेव ताकवणे, बाळासाहेब कापरे, डॉ. खळदकर, दिग्विजय जेधे, डॉ. वंदना मोहिते, लक्ष्मण दिवेकर हे प्रमुख नेते मंडळी प्रचारात सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.
आज कानगाव, कडेठाण, हातवळण, नानगाव, खोपोडी, दापोडी, देलवडी, पिंपळगाव, नाथाचीवाडी, उंडवडी आणि लडकतवाडी या गावांचा रमेश आप्पांनी दौरा केला.त्यावेळी गावागावात तुतारीचे आवाज घुमू लागले. याप्रसंगी गावागावांत तुतारी फुंकत,सजवलेल्या बैलगाडीतून रमेश आप्पाची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. यावेळी बोलताना रमेश थोरात म्हणाले, दौंड तालुक्यातील कोणत्याही गावातील कोणतीही व्यक्ती माझ्याकडे येवून हक्काने काम सांगतात,हा माझ्यावरील मोठा विश्वास आहे.हाच विश्वास मतपेटीतून व्यक्त करतील,आणी माझा विजय निश्चित करतील. कडेठाण येथील लाडक्या बहिणींनी थोरात यांना अकरा हजार रुपये निवडणुक निधी दिला.