Homeउद्योगकंत्राटी कामगारांना एकोणीस टक्के पगारवाढ द्यावी : वीज कंत्राटी कामगार संघाची मागणी

कंत्राटी कामगारांना एकोणीस टक्के पगारवाढ द्यावी : वीज कंत्राटी कामगार संघाची मागणी

दौंड तालुका ग्रामीण प्रतिनिधी / सुरेश बागल

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या आंदोलनाची दखल घेत उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.९ सप्टेंबर २०२४ रोजी वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांना १९ % वेतन वाढ एप्रिल २०२४ पासून लागू करण्या बाबत घोषणा केली होती .                  ऊर्जामंत्री यांनी प्रशासना समोर मूळ वेतनात १९ % घोषित केलेल्या पगारवाढ या शब्दाचा शब्द छळ तिन्ही वीज कंपनीच्या चाणाक्ष प्रशासकीय अधिकारी वर्गाने करून १९% पगारवाढीला निवडणूकीचा जुमला ठरवला आहे कि काय ? अशी शंका भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाला निर्माण झाली आहे.

निवडणूकी नंतर शासनाकडून प्रलंबित किमान वेतन वाढेल व त्यानंतर जाहीर केलेली १९ % वाढ रक्कम गायब होणार असल्याचे महानिर्मीती महापारेपण व महावितरण यांच्या परीपत्रकात दिसत आहे. मग याला पगारवाढ म्हणता येईल का? असा सवाल महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी प्रशासनाला विचारला. तसेच कोणतेही शब्द छळ न करता उर्जा मंत्री यांनी घोषित केलेली पगार वाढ फरका सहित त्वरित देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

शब्द छळ न करता संघटने सोबत मीटिंग घ्यावी तसेच वित्त विभागाने तातडीने कंत्राटदारांना पैसे दिल्यास तिन्ही कंपनीतील कामगारांना दिवाळी आनंदात साजरी करता येईल अन्यथा कामगार नाराज होतील व याचे विपरीत परिणाम आगामी काळात राजकीय पटलावर नक्कीच दिसतील असे अध्यक्ष निलेश खरात म्हणाले.

प्रशासनाने केलेल्या या कृत्याचा जाहीर निषेध महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने पत्राद्वारे नोंदवला असून,कामगार हितार्थ पुन्हा आंदोलनाची तयारी असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सर्व गोष्टी चीज आवडतात? ही झटपट मिरची चीज डोसा आपला नवीन आवडता असेल

चीजमध्ये काही चव अधिक चांगली बनवण्याची शक्ती आहे, बॉलिवूड नाही का? हे एक सँडविच, बर्गर, पिझ्झा किंवा कदाचित कढीपत्ता आहे, हे त्वरित त्यास आणखी...

ला लीगा: रिअल माद्रिदने ज्युड बेलिंगहॅमसह ओसासुनाने आयोजित केले

ला लीगाचे नेते रियल माद्रिदने शनिवारी ओसासुना येथे 1-1 च्या बरोबरीत दोन गुण सोडले ज्यामध्ये ज्युड ज्युड बेलिंगहॅम सिंट ऑफ झाला. स्पॅनिश चॅम्पियन्सने पहिल्या...

error: Content is protected !!