वृत्तवेध न्यूज नेटवर्क
दौंड – एक विचार, एक दिलाने पुढाकार घेऊन दौंड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांना निवडून आणण्याची जबाबदारी आता आपली आहे.येत्या २० नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांना शहरातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासंदर्भात दौंड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक पार पडली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोणताही संभ्रम मनात न ठेवता महायुतीचे जोमाने काम करावे.असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले.
दूरदृष्टी व दुरगामी विचाराचे नेते अजित पवारांचे नेतृत्व बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांना साथ देऊन जोमाने काम करावे.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे पाटील, शहराध्यक्ष गुरुमुख नारंग , युवक अध्यक्ष निखिल स्वामी, माजी नगरसेवक सुहास वाघमारे,अनिल साळवे तसेच मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.