ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संचलित इरा किड्स प्ले स्कूल व स्वरूप बालक मंदिर भोईटे नगर दौंड तर्फे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मुलांचे भाषणे तसेच गायन आणि डान्स असे सांस्कृतिक कार्यक्रम शाळेच्या वतीने घेण्यात आले यावेळी दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी मा.विजय कावळे सर उपमुख्याधिकारी मा.रणदिवे सर,डॉ.राजेश दाते सर तसेच माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार जयदीप बगाडे साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेचे संस्थापक सदाशिव रणदिवे सर, इरा किड्स प्ले स्कूल व स्वरूप बालक मंदिर मुख्याध्यापिका वैशाली रणदिवे या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका. प्रतिभा शिंदे ,शिल्पा कांबळे ,प्रतीक्षा गवळी मावशी. योगिता कसबे यांनी खूप परिश्रम घेतले