दौंड : राज्यातील मातंग समाजाला अनुसूचित जातीचे फायदे मिळावे. त्यामुळेच अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण झाले पाहिजे त्याबरोबरच साहित्यरत्न डाॅ.अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) ची स्थापना झालीच पाहिजे या मागणीसाठी मातंग समाजाने राज्यभर आंदोलन उभे केले होते.
अनुसूचित जातीमध्ये १३ टक्के आरक्षणात महाराष्ट्रातील ५९ जाती आहेत. काही ठराविक जातीलाच आरक्षणाचा फायदा मिळतो.इतर जातींमध्ये आरक्षणाचा सर्वांगीण अभ्यास होणे गरजेचे आहे.राज्य सरकारने हा अभ्यास करण्यासाठी आयोग नेमण्याची गरज आहे.अशी मागणी होत असताना अखेर अनुसूचित जातीचे अ,ब,क,ड असे उपवर्गिकरण करण्यासाठी राज्य सरकारने अभ्यास समिती स्थापन केली.अनुसूचित जातीतील उपवर्गिकरण संदर्भात निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी उपवर्गिकरणाचा जीआर आमदार अमित गोरखे यांना दिला.त्यामुळे दौंड शहरात मातंग समाजाने जल्लोष करत एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला.
याप्रसंगी लहुजी यंग ब्रिगेडचे संस्थापक नितीन तूपसौंदर्य त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.पत्रकार योगिता रसाळ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश तूपसौंदर्य, सागर कांबळे,धीरज दिवटे,निखिल ससाणे,महेश गायकवाड,गणेश खंडागळे,तुकाराम तूपसौंदर्य,शुभम तूपसौंदर्य,मयूर तूपसौंदर्य, सौरव आगलावे,ओमकार खुडे उपस्थित होते.