वृत्तवेध न्यूज
अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एकसंघाची महत्वपूर्ण बैठक रविवार (दि. ४) रोजी पंढरपूर येथे पार पडली. यावेळी अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एकसंघाची पुणे जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये पुणे जिल्हा अध्यक्षपदी सुनिल होमकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच इतर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- उपाध्यक्ष- संजय जौंजाळ, कार्याध्यक्ष – दत्तात्रय गानबोटे, सचिव – सीमा कल्याणकर, सहसचिव – संदिप बारटक्के, वि उपाध्यक्ष प्रदिप कळसकर, कार्यकारिणी सदस्य – अलका माळवदे, वैभव कालेकर, विवेक बगाडे, रुपेश क्षीरसागर, सिध्दनाथ माळवदकर, विजय मांढरे, प्रदिप क्षीरसागर, योगेश चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.