दौंड | अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुणे ग्रामीण विभागाच्या वतीने आयोजित केलेली ‘शिव मल्हार यात्रा’ आज दौंड नगरीत दाखल झाली. यावेळी शिव मल्हार यात्रेचे शहरात जंगी स्वागत करण्यात आले.शिवराज्याभिषेक दिनाची ३५० वी वर्षपूर्ती आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जगाला दिलेला समरसतेचा विचार सर्वसामान्यांच्या मनात रुजवण्यासाठी पुणे ग्रामीण भागात प्रवास यात्रा करणार आहे. यात्रा रथ दौंड मध्ये आल्यानंतर भाजपचे पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे,भाजप शहर अध्यक्ष स्वप्नील शहा, भाजप युवा मोर्चा दौंड शहर अध्यक्ष ओंकार कड्डे यांनी स्वागत केले.छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास आमदार राहुल कुल यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी मोहन पडवळकर, सुशीलकुमार मोटे,ओम व्हांकडे, दत्तात्रय जमदाडे, श्रेयस प्रभुणे, अभिजित भापकर, कमलेश काळे, स्वप्नील गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा पुढे मार्गस्थ झाली.