वृत्तवेध न्यूज नेटवर्क
देऊळगाव राजे – गुरुवर्य वैकुंठवासी तात्या महाराज श्रीगाेंदेकर यांच्या कृपाशीर्वादाने जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकाेत्तर अमृतमहोत्सवी ३७५ वा.वैकुंठ गमन साेहळ्याच्या निमित्ताने दिनांक २ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयाेजन करण्यात आले होते.
यावेळी विविध धार्मिक,पाैराणिक कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते. विठ्ठल मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पवित्र पादुका ठेवण्यात आले हाेते.यावेळी ग्रामस्थ आणि भाविकांची दर्शनासाठी मांदियाळी पहायला मिळाली.
संत तुकाराम महाराजांच्या चरित्राचे कथन पाेपट महाराज पवार, गाथा पारायण कैलास महाराज पवार यांनी केले.सप्ताहाच्या प्रसंगी महाराजांनी भक्ती, ज्ञान, वैराग्य, वृक्षारोपण, आई- वडिलांची सेवा, व्यसनमुक्ती, संत संगतीचे महत्त्व पटवून दिले.काल्याच्या किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली.याप्रसंगी ह.भ.प.पद्माकर महाराज देशमुख यांनी श्री कृष्ण चरित्राचे कथन केले. कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. व्यसनमुक्ती,आई – वडिलांचा सांभाळ, सासू-सासरे व सूनांच्या मध्ये निर्माण झालेला नात्यांमधील दुरावा, राजकारणाची बिघडलेली स्थिती, व माणूस माणूसकी विसरत चालला आहे. देऊळगाव राजे येथील विविध तरुण मंडळातील तरुणाईचा धार्मिक कार्यातील सहभाग तसेच सप्ताहाच्या निमित्ताने अन्नदान,,महाराजांच्या किर्तन सेवा,याबद्दल महाराजांनी सर्वांचे काैतुक केले. सप्ताहासाठी सढळ हाताने मदत करणाऱ्या भाविक भक्तांचा व महाराजांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
दाैंड तालुका प्रतिनिधी / सुभाष कदम